न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- ग्राहक जेवण करीत असताना त्यांना जेवणासोबत धुम्रपानासाठी तंबाखुजन्य हुक्का पदार्थ अवैद्यरित्या पुरवला. हुक्का बार चालविताना तसेच ८४९० रुपये किंमतीचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व त्यास लागणारे साहीत्य आरोपीने स्वतःजवळ बाळगले.
पोलिसांनी (दि. २१) रोजी सायंकाळी ५.०० च्या सुमारास पुणे-नाशिक हायवेच्या कडेला हॉटेल योगीराजमध्ये, कासारवाडी येथे कारवाई केली.
आरोपी विकास नरेंद्र साहू (वय २१ वर्षे, सध्या रा. निसर्ग हॉटेल, नाशिक फाटा, कासारवाडी) याच्यावर भोसरी ठाण्यात ६८६ / २०२३ भादवी कलम १८८, २८५, ३४ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ कलम ४ अ, २१ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि पासलकर पुढील तपास करीत आहेत.















