न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- वेगवेगळया माध्यमातुन आरोपीने जबरदस्तीने फिर्यादीकडून बेकायदेशिरपणे व्याजापोटी रक्कम वसुल केली. तरीही अवास्तव पैशांची मागणी करीत असल्याने फिर्यादीने आरोपीला कोणत्याही प्रकारे पैसे देणे नसल्याचे सांगत आरोपीच्या मागणीप्रमाणे रक्कम देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने बेकायदेशिरपणे फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीच्या आईला धमकाविले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ०४/०३/२०२१ ते आजपर्यंत) ज्युडसन हायस्कुलच्या बाजुला, पिंपरीत घडली. फिर्यादी शुभम उमाकांत ढाके यांनी आरोपी ओंकार कदम (रा. पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ८७१ /२०२३ भा.द.वी. कलम ४५२,५०६, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम कलम ९,४५ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पालांडे पुढील तपास करीत आहेत.















