न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- जलसंपदा विभागाच्या भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभाग कार्यालय, करंजविहीरे ता. खेड जि. पुणे येथील कार्यालयाच्या दरवाजाचे (दि.२० ते दि. २१) रोजी कुलूप व कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
२४,६०० रू. किंमतीचे लेजरजेट प्रींटर, २ गॅसटाकी, गॅसशेगडी, डंपी लेवल मशिन, लोखंडी चैनपुली व इतर साहित्य हे घरफोडी चोरी करुन चोरुन नेले आहे.
फिर्यादी वसंत महादू ढोकरे यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळूंगे एम.आय.डी.सी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात ५०७/२०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा ४६४ राठोड पुढील तपास करीत आहेत.















