- मेदनकरवाडीतील लॉजवर नेऊन केला बलात्कार; दोघे अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- महिलेचा पाठलाग करीत तिला रिक्षात जबरदस्तीने बसवले. फिर्यादी महिलेचे अपहरण केले. शिवीगाळी आणि हाताने मारहाण केली. महिलेला मोशी-आळंदी रोड येथील लाईम वुड लॉज येथे नेवुन आरोपीने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि २०) रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास मेदनकरवाडी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी संदिप सायस आरगडे (रा. गवळीनगर, भोसरी), रिक्षा ड्रायव्हर महादया उर्फ महादेव दशरथ पाचांगे (रा. बनकरवस्ती, मोशी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ६८२/२०२३ भादवि कलम ३६३, ३५४ (ड), ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करीत त्यांना गजाआड केले आहे. पोउपनि डेरे पुढील तपास करीत आहेत.















