न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- ओळखीचा फायदा घेवून फिर्यादी मुलीला लग्नाकरीता विचारले. फिर्यादीने लग्नास नकार दिल्यानंतर फिर्यादीला आत्महत्या करून फसवण्याची धमकी देणे, फिर्यादीच्या घरासमोर येवून तासनतास थांबणे अशाप्रकारे तिला मानसिक त्रास दिला. तसेच फिर्यादी कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना रुग्णालयाच्या भिंतीजवळ फिर्यादीचा रस्ता अडवून आरोपीने गाडीवर बसण्यास सांगितले. फिर्यादीने गाडीवर बसण्यास नकार दिला असता फिर्यादीचा हात पिरगाळून आरोपीने फिर्यादीच्या पाठीत मारून अश्लिल शिवीगाळ करीत ‘तूला सोबत चल म्हणतोय तर येत नाही, नाही आलीस तर तुला मारून टाकीन’ अशी धमकी देवून मारहाण करून फिर्यादीस सर्वांसमोर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.२५.०४.२०२३ ते दि.२२.०८.२०२३) दरम्यान मोर सुपर मार्केट समोरील जनरल हॉस्पीटलच्या भिंतीजवळ, चाकण रोड, तळेगाव दाभाडे येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी अथर्व दत्तात्रय जांभूळकर (वय १९ वर्षे रा. जांभूळगाव ता. मावळ जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी ४५६/२०२३ भा.द.वि. कलम ३५४, ३५४ (ड), ३२३, ३४१,५०४, ५०६ भादवि सहकलम ८.१२ पोक्सो अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोउपनि शिंपणे पुढील तपास करीत आहेत.















