न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- ‘हॉटेलवर आलो आहे, जेवण दे नाहीतर तुझे हॉटेल फोडतो, कामगारांना मारतो, तुझे हॉटेल बंद कर’ अशी तोंड ओळखीच्या आरोपीने फिर्यादीला फोन करून धमकी दिली. तसेच आरोपी क्र १ व त्याचा साथीदार आरोपी क्र ३ यांनी फिर्यादीच्या हॉटेलच्या किचनमधुन उलथने घेऊन फिर्यादीच्या हॉटेलमधील कामगारांना मारण्याची धमकी देत हॉटेलमधील ग्लास, ताट व टेबल खुर्च्या फोडुन नुकसान केले.
फिर्यादीचा भाऊ हॉटेलवर असताना पुन्हा आरोपी क्र १ व २ हे हॉटेलवर आले व लॉलीपॉप मागीतला. लॉलीपॉप दिला नाही म्हणुन शिवीगाळ करून हॉटेलमधील टेबल खुर्च्याना लाथा मारुन फिर्यादी यांच्या भावास आरोपी क्र २ याने लाकडी दांडकं घेऊन पाठीत, पायावर व डोक्यात मारुन दुखापत केली आहे. आरोपी क्र १ हा अंगावर मारण्यासाठी धावुन आला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी सायंकाळी ५.३६ च्या सुमारास व ९.१५ वाजता माऊली हॉटेल, अंगणवाडी चौकाजवळ, मोरे वस्ती, चिखली येथे घडला. फिर्यादी ज्ञानेश्वर इरप्पा हेळवे यांनी मोहन बाळु भोसले, सोन्या उर्फ अशोक शंकर राठोड, हिंग्या आबासाहेब कोळेकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ५६२ / २०२३ भादंवि कलम ३२४, ३५२, ४२७, ५०४, ५०६, ३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि कुमटकर पुढील तपास करीत आहेत.















