न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- घराच्या आसपास महिलेचा आरोपीने पाठलाग केला. फिर्यादी महिलेने त्याच्यासोबत प्रेमसंबध ठेवावे, त्याच्याशी लग्न करावे, अशी मागणी तो महिलेकडे मागणी करत होता. फिर्यादी महिलेने त्याला नकार दिला असता त्याचा त्याला राग आला.
त्याने महिलेला शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीचे आई-वडील व मामाने त्यास समजाविले असता त्यांना शिवीगाळ केली व फिर्यादी महिलेला अॅसीड टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी ६.०० पासुन आदर्शनगर, दिघी येथे सुरु होता. महिला फिर्यादीने आरोपी यश उर्फ करण संजय लोणारे याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. दिघी पोलीस ठाण्यात आरोपीवर ३९५/२०२३ भादवि कलम ३५४ (ड), ५०४,५०६,५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा पो फौज पारधी तपास करीत आहेत.












