न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- डुडुळगावातील तापकीरनगर येथील भाविक भजणी मंडळ धर्मशाळेच्या ऑफीसमध्ये (दि. २०) रोजी ११.०० वा. फिर्यादी यांचा ५००० रुपये किंमतीचा व्हिओ कंपनीचा मोबाईल आरोपीने चोरी केला.
फिर्यादी यांचा पासवर्ड वापरून फिर्यादीच्या युनियन बँक खाते आणि फोन पेवरुन आरोपीने त्याच्या मोबाईलवर ९४,८०१ रुपये ट्रान्सफर करुन घेत चोरी केली.
फिर्याद संतोष विक्रम बर्डे यांनी आरोपी अजय माळी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी ३९२/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोना बहिरट तपास करीत आहेत.












