न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- शाईन दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी जात असताना ट्रक (एम.एच.०४/बी.यु.५३४३) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हा हयगयीने व निष्काळजीपणे दुर्लक्ष करुन वाहतुक नियमांचे उल्लंघन करून चालविला.
फिर्यादी यांचा भाऊ रामदास वडजे यांच्या दुचाकीला पाठीमागुन जोरात धडक देवून अपघात केला. दुचाकीचे नुकसान करून फिर्यादीच्या भावाला गंभीर जखमी केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक त्यांच्या मृत्युस कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २३) रोजी सकाळी ७.३० वाजता विठठल लॉन्स, लक्ष्मी चौक, हिजवडी रस्त्यावर घडली. फिर्यादी संजय माधव वडजे यांनी आरोपी रंगनाथ रामभाऊ तांबे याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ९९६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०४(अ), ३३८, ४२७ मो.वा.का. कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. मपोउपनि बोरकर पुढील तपास करीत आहेत.