- जागा मालकाची पोलिसात धाव; भोसरी पोलीसांनी ठोकल्या दोघांना बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- मालकीच्या जागेवर घराचे बांधकाम करत असताना आरोपी फिर्यादीच्या जागेमध्ये बळजबरीने घुसला. बांधकामाचे खांब पाडून बांधकामाचे नुकसान केले. फिर्यादीला शिवीगाळ करुन फिर्यादीच्या पत्नीला व सुनेला मारहाण केली. फिर्यादीच्या अंगावर धावून “मी मर्डर करून जेलमध्ये जाऊन आलेलो आहे, तुला संपवून टाकीन” अशी धमकी दिली.
तसेच आरोपी क्र १ हीने फिर्यादीच्या पत्नीला व सुनेला मारहाण केली. ‘आता मि येथून हालत नाही जा, तुला काय करायचे आहे ते कर’, असे म्हणाली व फिर्यादीच्या जागेवर बसून राहीली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. ०५ जुलै २०२३ पासून दि. २४/०८/२०२३) पर्यंत हनुमान कॉलनी क्र. ६, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडला.
फिर्यादी राजकुमार सिध्दाप्पा कळसे (वय: ४५ वर्षे, धंदा भाजीपाला व्यवसाय, रा:- हनुमान कॉलनी क्र. ६, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी महीला आरोपी (वय: ४५ वर्षे, धंदा:-धुणेभांडी, रा:- बापन्नखोल्या, शास्त्रीचोक, हनुमान कॉलनी क्र. ६, चक्रपाणी वसाहत भोसरी), रुपेश ऊर्फ गोटया ज्ञानेश्वर देवकर (वय २४ वर्षे, धंदा:- प्लंबींग, रा:- बापन्नखोल्या, शास्त्रीचौक, हनुमान कॉलनीक, ६ चक्रपाणी वसाहत भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलीसांनी ६९९/२०२३, भा.दं.वी. कलम ४४१, ४४७, ४५२,३५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. पोउपनि पवार पुढील तपास करीत आहेत.












