- हिंजवडी पोलीसांची कारवाई; आरोपी जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- टेम्पोमधून आरोपीने २,६२,००० रुपये किंमतीचे देशी व बिलारी जातीची गायी व कालवड यांची दाटीवाटीने जनावरे उभी करुन वाहतूक केली. त्यांना चारा, अन्नपाणी, औषधे या सुविधा दिल्या नाहीत.
पोलिसांना माहिती मिळताच (दि. २४) रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास गणेश मंदीराजवळ, येळवंडे वस्ती, नेरे, दत्तवाडी ता मुळशी जिल्हा पुणे येथे कारवाई करून जनावरांसह टेम्पो ताब्यात घेतला. निसार शब्बीर शेख (वय ३४ वर्षे, रा. खेडकर चौक, लोहीयानगर, गंजपेठ, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
आरोपीने तपासात जनावरे कोणाकडून खरेदी केली आहेत व कोणास विकणार आहे? याबाबत माहीती दिली नाही. तसेच सदरची जनावरे ही कत्तलीसाठी कोंढवा येथे नेत असल्याचे तपासात सांगितले.
हिंजवडी पोलीस ठाण्यात १००३ / २०२३ प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतीबंध करण्याबाबत अधिनियम कलम ११.११ (घ) महाराष्ट्र प्राणि रक्षण अधिनिअम १९७६ कलम ५ (अ), ५ (ब), ९ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुदळ पुढील तपास करीत आहेत.












