न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बसविलेल्या मोबाईल टॉवरच्याखालील व्होडाफोन-आयडीया कंपनीचे SBAND ४G या कंपनीचे कार्ड आणि व्होडाफोन-आयडीया कंपनीचे SBAND 2G या कपंनीचे कार्ड ज्याची ९०,००० रूपये किंमत आहे ते अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहे.
हा प्रकार (दि. १९) रोजी ०१.५० वा ते ०२.११ च्या सुमारास साई मंदिराजवळील कॉलनी नं. ०१, एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांचे तर्फ बसविण्यात आलेल्या टॉवरचे खाली, वडमुखवाडी, च-होली येथे घडला.
फिर्यादी अरविंद शंकर मकरे यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी ३९७/२०२३ भादवि कलम ३७९ नुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा मरभळ तपास करीत आहेत.












