न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- एअर इंडियामध्ये सेटिंग असुन आरोपीची तेथे चांगली ओळख आहे. त्याच्याकडे एअर इंडियाच्या तिकीटाचा कोटा आहे. त्यावर त्याला ४० टक्के डिस्काऊंटमध्ये तिकीट मिळतात, असे खोटे सांगुन फिर्यादीला कॅनडाचे तिकीट देण्याचे आमिष दाखविले.
फिर्यादीकडुन एकुण २,७०,००० रूपये स्विकारुन आरोपीने त्यांना कोणतेही तिकीट न देता पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली आहे. हा प्रकार (दि.१६/०७/२०२३ ते अदयापपर्यंत) ताथवडे, इंदिरा कॉलेजमागे घडला.
फिर्यादी फिरोज अस्लम आलम यांनी आरोपी लविश जैन याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीवर १००८/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि काकडे पुढील तपास करीत आहेत.












