न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलेला पैशांचे अमिष दाखवले. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेने (दि. २३) रोजी रात्री ९.०० च्या सुमारास विनोदे वस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे कारवाई करून १२,०३० रुपये किमतीचा मुद्देमाला जप्त केला.
प्रतिक विलास अल्हाट (वय २३ वर्षे रा. वेताळ महाराज कॉलनी, शितोळेनगर, जुनी सांगवी) याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीसांनी १००१/२०२३ भा.दं.वि. कलम- ३७०, (२) सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४, ५ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुदळ पुढील तपास करीत आहेत.












