न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक त्याचं वाहन चाकण-तळेगाव रस्त्यावरून तळेगावकडे घेवुन जात होता. दरम्यान (दि. २४) रोजी सकाळी ५.४५ च्या सुमारास अनुसया कंपनीसमोर, म्हाळुंगे येथे आल्यानंतर त्याने हयगयीने, निष्काळजीपणे त्याचे वाहन चालवुन रस्त्याने पायी जाणारा इसम रामदास रतन गवई (वय ५३ वर्षे, रा. सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड, जि. पुणे; मुळ रा. सांगवी, ता. बाळापुर, जि. अकोला) यांना पाठीमागुन धडक दिली.
अपघात करुन त्यांना गंभीर जखमी केले. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आरोपी त्यांच्या मृत्युस कारणीभुत होवुन अपघात ठिकाणी न थांबता तसेच त्यांना उपचारास न नेता अपघात स्थळावरून पळुन गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी सचिन मनमोहन देउळकर यांनी आरोपी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ५१३/२०२३ भादवि कलम ३०४ (२) २७९, ३३७, ३३८, मोवाका कलम १८४, १३४ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.












