- त्यांच्या जागी नवनियुक्त प्रवीण जैन यांनी स्वीकारला पदभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांची पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रवीण जैन यांची राज्य सरकारच्या वित्त विभागाने बदली केली आहे.
प्रविण देविचंद जैन यांनी २३ ऑगस्ट रोजी पदभार स्विकारला आहे. या आधी जैन मुंबई येथील डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत होते. या पदावर कार्यरत असताना शासनाकडून त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
प्रविण जैन यांनी ग्राम विकास विभागात असताना प्रधान मंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपसचिव तथा वित्तीय नियंत्रक, उल्हासनगर महानगरपालिका येथे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागात अप्पर सचिव, रायगड येथे जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड जिल्हा परिषद येथे मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदांवर काम केलेले आहे. जैन यांची एकूण २५ वर्ष सेवा झालेली आहे.












