- उलटपक्षी चिंचवड पोलीस ठाण्यात एकाकडून परस्पर फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२३) :- फोनवर बोलत जात असताना आरोपी यांनी आपसात संगणमत करुन फिर्यादीला ‘मादरच्योत कोणाला फोन लावतोस, तुझ्या मदतीला कोण येते, ते बघतोच’ तसेच शिवीगाळ करुन ‘पोलीसाला फोन लावतोस काय’ असे म्हणुन आरोपी १ याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने तसेच सह आरोपी २ याने कोयत्याने व त्याचा साथीदार सह आरोपी ३ याने सिमेंटच्या गट्टूने फिर्यादीच्या राहत्या घराच्या परिसरातील जाण्या येण्याच्या रस्त्यावरील दुचाकी ढकलुन तसेच लाथा घालुन खाली पाडुन गाडीवर कोयत्याने मारुन त्याचे नुकसान करीत फिर्यादीला डाव्या डोळयाजवळ कोयत्याने मारुन जखमी केले.
तसेच फिर्यादीचे मामा साहेबराव म्हस्के यांच्या डोक्यात पाठीमागुन तसेच हाताची करंगळी व पायाच्या अंगठयावर लोखंडी कोयत्याचा वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांची आत्या लक्ष्मी म्हस्के हीच्या उजव्या हातावर आरोपीने लोखंडी रॉड मारून जखमी केले. सह आरोपी ३ याने बबन गायकवाड यांच्या डोक्यात व पाठीवर सिमेंटच्या गटटुने मारहाण केली. लोकांच्या घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकींचे नुकसान केले. हातातील कोयते व लोखंडी रॉड हवेत फिरवुन आरडाओरडा करुन परिसरात दहशत निर्माण केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २५) रोजी रात्री १.०० ते १.३० च्या सुमारास आनंदनगर येथे घडला. फिर्यादी सुभाष भारत शिंदे (वय २५ वर्षे, व्यावसाय नोकरी, रा. आनंद नगर, कुपर कोपरा रेल्वे पटरीचे बाजुला चिंचवड) यांनी आरोपी १) नरेश ऊर्फ कृष्णा भंडारी (रा. आनंदरनगर), आदित्य, त्यांचा एक साथीदार आरोपी निष्पन्न रोहीत ऊर्फ निम्या चन्नप्पा गोपरेड्डी (वय २४ वर्षे धंदा खा. नोकरी रा. बाबु भंडारी चौक आनंदनगर झोपडपटटी चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ४१७/२०२३भा.द.वि कलम ३२६,३०७,४२७,३४ आर्म अॅक्ट ४ (२७) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ व क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोउपनि व्हरकटे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान याप्रकरणी नागम्मा मारुती भंडारी (वय ४० वर्षे, धंदा- धुणीभांडी, रा.लहुजी वस्ताद व्यायाम शाळेसमोर, कुपर कोपरा, आनंदनगर, चिंचवड) यांनी परस्पर फिर्याद दिली आहे. फिर्यादीत फिर्यादीचा मुलगा कृष्णा ऊर्फ नरेश भंडारी (वय १९ वर्षे) याला गाडया तोफफोड करण्याच्या कारणावरुन आरोपी १) सुभाष भारत शिंदे (वय २५ वर्षे व्यावसाय नोकरी रा आनंद नगर, कुपर कोपरा रेल्वे पटरी) २) त्यांचे इतर साथीदार (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही.) यांनी त्या च्या डोक्यात सिंमेटचा गटटु फेकुन मारुन त्याला गंभीर जखमी केले आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात ४१८/२०२३ भादवी कलम ३२६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












