न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२३) :- दुचाकीवरून फिर्यादी व त्यांचा मित्र (दि. २५) रोजी अंदाजे रात्री १०.४५ वा. च्या सुमारास फिर्यादीच्या अॅक्टीवावरून जात होते. दरम्यान कँपजेमिनी कंपनी, तळवडेजवळ ड्रीमबार समोरील रस्त्याच्या वळणावर महिंद्रा बोलेरो मँक्स पिकअप पांढ-या रंगाच्या (त्यावर रजिस्ट्रेशन नंबर नसलेली) गाडीवरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे, हयगयीने, भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली.
फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांचा मित्र तानाजी रामचंद्र बोधने (वय २० वर्षे, निघोजे) यांचा अपघातात मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक फिर्यादिच्या मित्राच्या मरणास कारणीभूत झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी चेतान अनिल कुचनकर यांनी प्रदिप रमेश कांबळे (वय ३२ वर्षे, धंदा चालक, रा. रुपीनगर निगडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी ४७६ / २०२३ भा.द.वि. ३०४(अ), ३३७, ३३८, २७९, सह मोटार वाहन अधिनीयम १८४,१३२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पोउपनि पाटील तपास करीत आहेत.












