न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२३) :- यु टयुबवर चॅनेलच्या टास्क पुर्ण केल्यानंतर प्रत्येक टास्कसाठी तुम्हाला ५० रुपये इतके पैसे मिळतील, असे आरोपी महिलेने मोबाईलद्वारे फिर्यादीला सांगितले. सुरुवातील टास्क केल्यानंतर आरोपीने काही रक्कम फिर्यादीच्या खात्यात पाठवली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असणा-या मोठया रकमेच्या टास्क असल्याचे सांगुन त्यामध्ये जास्त प्रमाणात पैसे मिळतील, असे फिर्यादीला सांगुन सुरुवातीला टास्क केल्यानंतर त्यांचे पैसे व नफा असे त्यांना पाठवले. फिर्यादीला विश्वासात घेतले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला आणखी टास्क करण्यास प्रवृत्त केले.
त्यावेळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादीने टास्क केले. परंतु, त्यांनी तुमचा टास्क पुर्ण झाला नाही; त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला आणखी टास्क पुर्ण करावे लागतील, असे फिर्यादीला सांगितले. आरोपीच्या खात्यात वेळोवेळी पैसे पाठविण्यास सांगुन आरोपी यांनी फिर्यादीने गुंतवुणक केलेले पैसे परत न करता तसेच त्यांना कोणताही नफा न देता त्यांची एकूण १६,४०,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २२) ते (दि २३) या कालावधीत म्हाळुंगे येथे घडली.
फिर्यादी अनुप केशवराव मोहोड यांनी आरोपी आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक ६८३३०५५००३८०, आयएफएससी कोड आयसीआयसी ०००६८३३, बैंक पंजाब नॅशनल बँक खाते क्र९१६७००२१००००४५८९. आयएफएससी कोड पीएनबी ०९१६७००, बँक पंजाब नॅशनल बँक खाते क्र ४२०४००२१०००१०३४९, आयएफएससी कोड पीयुएनबी ०४२०४००, इंडसलंड बँक खाते क्र १००२०५२४६७७४, आयएफएससी कोड आयएनडीबी ००००८६६ मोनं ८८२५८३६०८९ तसेच टेलिग्राम चॅनल धारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी १०१३ /२०२३ भा.दं.वि.सं. कलम ४१९, ४२०, ४०६, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि काकडे पुढील तपास करीत आहेत.












