न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२३) :- बेकायदा गावठी हातभटटीसाठी लागणारे अंदाजे १,५०,००० रुपये किमतीचे ३,००० लिटर कच्चे रसायण जवळ बाळगुन आरोपी महिलेने हातभटटीच्या दारुची भटटी अनाधिकाराने, विनापरवाना बेकायदेशीर लावली.
याबाबत पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनला खबर मिळाली. त्यांनी (दि. २५) रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास कोयाळी गावाजवळील भिवरे वस्ती येथे ओढयाच्या कडेला कारवाई केली.
आळंदी पोलिसांनी महिला आरोपीच्या विरोधात २१७/२०२३ महाराष्ट्र दारुबंदी अधि, कलम ६५ (फ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोना जाधव पुढील तपास करीत आहेत.












