- आळंदीतील भाजी मार्केटमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२३) :- जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी व फिर्यादीचे पती यांना आरोपी १ व त्याची पत्नी आरोपी २ व एक अनोळखी इसम यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताने मारहाण केली.
आरोपींनी फिर्यादीच्या नाकावर, हाताने, बुक्की मारून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर करून त्यांना जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २४) रोजी रात्री ९.०० च्या सुमारास भाजी मार्केट, आळंदी येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी बाळु घुंडरे, महिला आरोपी व एक अनोळखी इसम (नाव, पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी २२०/२०२३ भा.दं.वि कलम ३२५,३२३, ५०४, ५०६,३४ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोना २८०६ रासकर पुढील तपास करीत आहेत.

















