न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२३) :- हिंजवडीतील मेट्रोच्या ब्रिजखालून मेट्रो लाइनववरील मेट्रोच्या कामाची १,८०० रुपये किंमतीची एक लोखंडी जाळी व ९,००० रुपये किंमतीची काळ्या रंगाची केबल असा एकुण १०८०० रुपये किंमतीचा ऐवज (दि. २७) रोजी पहाटे १.४५ वा. सुमारास रिक्षा (एमएच१४एचएम७३९५) मधुन आरोपी चोरून घेवून जाताना फिर्यादीच्या निदर्शनास आले.
फिर्यादी सिध्देश्वर विकास मस्के यांनी आरोपी बंटी सुरेश नवगीरे, स्वयम विकास कांबळे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी १०२२/२३ भा.दं.वि. कलम ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे. पोना १९०१ चव्हाण पुढील तपास करीत आहेत.











