न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीला ‘भांडणे आपापसात मिटवून घेऊ’ असे फोनवर सांगून आरोपींनी बोलून घेतले. त्याप्रमाणे फिर्यादी व फिर्यादीचा मित्र ज्ञानेश्वर पोपट शिंदे असे दोघेजण घटनास्थळी गेले. तिथे आरोपी क्र. १ याने काहीएक न विचारता फिर्यादीला ‘आता तुला जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणुन त्यांच्याजवळ असलेला लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारला. त्यावेळी फिर्यादीने हात आडवा घातला असता फिर्यादीला आरोपीने खाली पाडले. त्यानंतर सह आरोपी क्र. २ याने फिर्यादीच्या डोक्याच्या पाठीमागे कोणत्यातरी लोखंडी हत्याराने जोरात मारहान करून त्यांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीला वाचवण्यासाठी फिर्यादीचा मित्र ज्ञानेश्वर हा मध्ये आला असता त्यालासुद्धा आरोपी क्र. १ व २ व त्यांच्यासोबत असलेले दोन अनोळखी इसमांनी दगडाने हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
तसेच जाताना आरोपी क्र १ हा फिर्यादीला म्हणाला ”आम्ही आळंदी परिसरातील भाई असून, तू आमची पोलिसात तक्रार केली, तर तुझा खुन करीन” अशी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि ३०/०८/२०२३) रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास आळंदीतील गो शाळा जवळील नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये घडली.
फिर्यादी शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे (वय २३ वर्षे, धंदा मजुरी, रा. शिवराज नगर, अमूल्यम सोसायटी जवळ, डूडूळगाव) यांनी आरोपी १) हरीओम पांचाळ, २) अर्जुन सूर्यवंशी (पूर्ण नाव माहित नाही, रा. आळंदी) व त्यांच्या सोबत असलेले इतर २ अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
आळंदी पोलिसानी २२६/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३२४, ३२३, Criminal law amendment act ३,७, म.पो.का. कलम ३७ (१) सह १३५, भारतीय शस्त्र अधिनियम ४ (२५), (२७) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.







![[आळंदी] :- जुन्या भांडणाचा राग अनावर झाल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-7-90x60.jpeg)
![[आळंदी] :- जुन्या भांडणाचा राग अनावर झाल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-1-90x60.jpeg)



