- नायब तहसीलदारांची दोघांच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :- उच्च न्यायालय आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी फिर्यादी हे बांधलेल्या रो हाउस मिळकतीच्या ताब्याच्या अनुषंगाने कार्यवाही कण्यासाठी गेले होते. फिर्यादी हे त्यांचे कर्तव्य करीत असताना आरोपी क्र १ याने फिर्यादीसोबत हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. तेथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व बँकेचे कर्मचारी यांनाही शिविगाळ, धक्काबुक्की केली.
सह आरोपी क्र. २ हिने हाताने मारहाण करून, वाईट वाईट शिवीगाळ करुन संगणमत करून मिळकतीचा ताबा घेत असताना शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि ३१/०८/२०२३) रोजी दुपारी १२.३० ते २.४५ च्या सुमारास पिंपळे सौदागर येथील स.नं.३३/१,३२/१/२,३५/१९.३५/१वी,३६/१,२७/४/२ मधील रो हाउस नंबर ६३, मयुरेश्वर साई, निसर्ग पार्क को-ऑप हो सोसा लि येथे घडली.
फिर्यादी प्रविण किशन ढमाले (नायब तहसीलदार, अप्पर तहसील कार्यालय, पिंपरी-चि.) यांनी आरोपी ऋषीकेश रविकुमार राक्षे (रा. रो हाउस नंबर ६३, मयुरेश्वर साई, निसर्ग पार्क को-ऑप हौ. सोसा. लि. पिंपळे सौदागर), महीला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ४६१/२०२३ भादवि कलम ३५३,३२३, ५०४, ५०६,३४ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि ढगे पुढील तपास करीत आहेत.







![[पिंपळे सौदागर] :- रो हाउसचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-90x60.jpeg)
![[पिंपळे सौदागर] :- रो हाउसचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/348a6c29-d577-4717-a75e-63ff8e684e2f-1-90x60.jpeg)



