- पांडाभाऊ साने यांनी शेवटच्या क्षणी दाखविली माणुसकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :-घरगुती सामान आणण्यासाठी फिर्यादीचा १९ वर्षीय भाऊ (रा. शरदनगर, चिखली) हा त्याच्या बजाज पल्सर गाड़ीवरुन जात होता. दरम्यान आरोपीच्या ताब्यातील पीएमपीएमएल बस (एमएच१४एचयु४७९६) आरोपी वाहन चालकाने भरधाव वेगात, हयगयीने, अविचाराने, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली.
फिर्यादीच्या भावाच्या दुचाकीला बसच्या डाव्या बाजुने धडक दिली. त्यामुळे तो दुचाकीवरून खाली पडला. बसचे मागील डावीकडील चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने गंभीर जखमी होऊन फिर्यादीच्या भावाचा जागीच मृत्यु झाला. आरोपी हा त्याच्या मृत्युस कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि ३१/०८/२०२३) रोजी सकाळी ०८.३० वाजताच्या सुमारास शुभम बार समोरील सार्वजनिक रोडवर, साने चौक, चिखली येथे घडला. फिर्यादी संग्राम धोंडीराम अर्जुने यांनी आरोपी सुनिल सुभाष दुधाळकर (वय २७, धंदा चालक, रुपीनगर, तळवडे – पीएमपीएमएल बस एम एच १४ एच यु ४०९६ हिचेवरील चालक) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ५८१ / २०२३ भा.द.वि. कलम ३०४(अ), २७९,३३८, मो.हे. अॅक्ट कलम १८४ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
”साने चौकात भरधाव वाहनामुळे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मी सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी मदतकार्य पोहोचविले. घटना होऊन अर्धा तास झाला, तरी बचाव कार्यासाठी संबधित यंत्रणा दाखल झाली नाही. फोनद्वारे माहिती प्राप्त झाली. सदर घटनेची माहिती साने चौक पोलीस स्टेशन आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना दिली आणि ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो. मयत व्यक्तीचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी वायसीएम हॉस्पिटलला हलवला. पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह मृत व्यक्तीच्या मूळगावी लातूर या ठिकाणी पाठवला.
– पांडाभाऊ साने, सामाजिक कार्यकर्ते….












