- आई-वडिलांच्या वाद विकोपाला; १५ वर्षीय मुलाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- आई-वडिलांचे पटत नाही. त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यातील वादाला कंटाळून १५ वर्षीय मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. देव संजयकुमार (वय १५, देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. ३०) रात्री घडली.
देहूरोड रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, आई-वडिलांच्या वादातून मुलाने कंटाळून आत्महत्या केली आहे. मुलाच्या आई-वडिलांमध्ये पटत नव्हते. मुलाचे वडील रागीट स्वभावाचे होते.
सतत होणाऱ्या वादामुळे मुलाची आई गावी मथुरेला गेली होती. आई-वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत गेल्याने मुलगा चिंतेत होता. त्यातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मालगाडीच्या चालकाने तक्रार दिली होती.















