न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी (दि. ३) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते शरदनगर व दुर्गानगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) गृहप्रकल्पातील सदनिकांचे हस्तांतरण कार्यक्रम सकाळी नऊला होणार आहे.
या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. महेश लांडगे, आ. अश्विनी जगताप, आ. अण्णा बनसोडे, आ. उमा खापरे, प्रभागाचे माजी नगरसेवक भीमा बोबडे आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम निगडी, त्रिवेणी चौक येथील इन्फंट चर्चजवळ होणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून एकूण ६६० झोपडीधारकांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.















