- विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा आणि बारावी / आयटीआय नंतरच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे या प्रक्रिया प्रवेशाची अंतिम तारीख दि. ८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे आदी प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहिती dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.
कोणत्या शाखेत ‘घेता येईल प्रवेश…
■ बारावी उत्तीर्णः औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका
■ बारावी / आयटीआय : थेट व्दितीय वर्ष पदविका अभ्यासक्रम
संस्था स्तरावरील कोट्यामध्ये आणि ‘कॅप’नंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून ई-स्क्रूटनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटनीव्दारे कागदपत्रांची पडताळणी, अज निश्चिती करणे आवश्यक आहे उमेदवारांनी प्रवेशासाठी संस्थांमध्ये माहिती स्वतंत्रपणे अर्ज करावेत, असे आवाहन डीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी केले आहे.















