न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- पवना धरण शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहे. विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदीमध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी ९.३० वाजता ८०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. हा विसर्ग दुपारी १२ वाजता वाढवून ८०० क्यूसेक्स वरून १४०० क्यूसेक्स करण्यात येणार आहे.
तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात आले हि कि, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.













