न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- ‘कामाच्या टास्कवर कमिशन देतो’ असे आरोपींनी फिर्यादीला आमिष दाखविले. त्यासाठी आरोपीने त्याच्या येस बँक, शर्मा ट्रॅव्हल्सचे बँक खाते नंबर ०६७९८९४००० ० ०५६३ त्याचा आयएफएससी कोड नंबर yesb ००००४१९, आयसीआयसी बँक खाते नंबर ६९७३०५६०२१६४, आयएफएससी कोड नंबर icic ०००६९७३ व सह आरोपी क्र. २ बी टु ट्रेडर्सचा करंट खाते नंबर ०२३२६१९०००००९९६ आयएफआयसी कोड नंबर yesb ००००२३२ या खात्यावरील अज्ञात इसमांनी फिर्यादीकडुन वेळोवेळी एकुण ७,१४,६२८ रुपये घेतले.
फिर्यादीला आरोपींनी सुरवातीला कमिशन देत फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २०/०८/२०२३) ते (दि. २५/०८/२०२३) पर्यंत फिर्यादीच्या राहत्या घरी नेवाळे वस्ती, चिखली येथे घडला.
फिर्यादी बाबासाहेब रमाजी वाळुंज यांनी १) महिला आरोपी २) प्रकाश पाटील (पुर्ण नांव व पत्ता माहीत नाही) व बँक खातेदार अज्ञात इसम (नांव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस ठाण्यात ५८४ /२०२३ भा.द.वि. कलम ४२०,३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि मस्के पुढील तपास करीत आहेत.










![[चिखली] :- 'कामाच्या टास्कवर कमिशन देतो'...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-1-1-90x60.jpeg)
![[चिखली] :- 'कामाच्या टास्कवर कमिशन देतो'...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-1-1-90x60.jpeg)



