न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- तोंडाला रुमाल बाधुन दुकानात मागील उघड्या दरवाजातून प्रवेश केला. आरोपी हा तिथे कामाला आहे. त्याने १५,००० रुपये किंमतीचा पिको कंपनीचा मोबाईल हँन्डसेट व ९२०० रुपये रोख रक्कम चोरुन नेली.
चोरी करताना आरोपी हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. हा प्रकार (दि. ३१/०८/२०२३) रोजी रात्री २.२५ च्या सुमारास केएनएस पिझ्झा शाँप, अजमेरा पिंपरी येथे घडला.
फिर्यादी निलेश नथमलजी सोनी (वय ३० वर्षे, रा. विझडम पार्क, मोरवाडी पिंपरी) यांनी आरोपी उमेश वाग्ने (वय अंदाजे २२ वर्षे, रा. वकसई, संत तुकारानगर चाळ, लोणावळे, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ९०४/२०२३ भादवि कलम ३८१ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.











![[पिंपरी] :- तोंडाला रुमाल बांधून पिझ्झा शॉपमध्ये चोरी करणारा तरूण गजाआड...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/press-photo-1-90x60.jpg)
![[पिंपरी] :- तोंडाला रुमाल बांधून पिझ्झा शॉपमध्ये चोरी करणारा तरूण गजाआड...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/Screenshot_20210725-125758_Google-90x60.jpg)





