न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- खाऊचे आमिष दाखवुन फिर्यादीच्या ५ वर्षीय मुलीला अज्ञात कारणासाठी तीच्या अज्ञातपणाचा फायदा घेत तीला फुस लावुन आरोपीने नेले होते. ही घटना (दि २) रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास गुरुकुल आश्रममधील महाराणा प्रताप गो शाळा, चापेकर अनाथ आश्रम चिंचवड, येथे फिर्यादी सत्संगाकरीता गेले होते त्यावेळी घडली.
२९ वर्षीय महीला फिर्यादीने आरोपी राजदिप रामआसारे राजपुत (वय २३ वर्ष रा. डांगे चौक, थेरगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात ४३५ /२०२३ भा.दं. वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मुलगी मिळुन आली असुन तिच्या आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आली आहे. पोउपनि मोरे पुढील तपास करीत आहेत.











![[चिंचवड] :- खाऊचे आमिष दाखवुन ५ वर्षीय मुलीला फुस लावुन पळविले...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/pizza-shops-and-store-front-flat-style-vector-9183319-90x60.jpg)
![[चिंचवड] :- खाऊचे आमिष दाखवुन ५ वर्षीय मुलीला फुस लावुन पळविले...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-3-1-90x60.jpeg)





