न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- ह्युंदाई एक्सेंट ही चारचाकी गाडी (एमएच१२केएन६३४३) फिर्यादीने आरोपी यांना २,६०,००० रुपये किंमतीला विकली. त्याच दिवशी त्याने फिर्यादीला ७०,००० रुपये रोख, १५,००० रुपये ऑनलाईन व ३५,००० रुपये खात्यावर ट्रान्सफर केले. एकुण १,२०,००० रुपये एवढी रक्कम फिर्यादीला आरोपीने दिली.
उर्वरीत रक्कम १,४०,००० रुपये रक्कम दोन महिन्यामध्ये देतो, असे फिर्यादीला आश्वासन दिले. उर्वरीत रक्कम १,४०,००० रुपये परत करण्यास टाळाटाळ करुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन आरोपीने फिर्यादीची १,४०,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि १९/०५/२०२१ ते दि. ०२/०९/२०२३ पर्यंत) भुजबळ चौक, वाकड येथे घडली. फिर्यादी कैलास तुळशीदास भोरे यांनी आरोपी अशोक जडीयप्पा कुराडे याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. वाकड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात ८६७/२०२३ भादवि कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल आहे. पोउपनि गिरनार तपास करीत आहेत.











![[वाकड] :- कारचे उर्वरित पैसे न देता एकाला लाखाला गंडा..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/Screenshot_20210725-125758_Google-90x60.jpg)
![[वाकड] :- कारचे उर्वरित पैसे न देता एकाला लाखाला गंडा..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-4-1-90x60.jpeg)





