न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- मुंबई-पुणे हायवे रोडलगत वाकडच्या सर्व्हिस रोडवर भुजबळ चौकाजवळ, वाकड चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला (दि. २) रोजी सायंकाळी ५.४० च्या सुमारास आरोपी क्र. १ याने त्याच्याजवळ एकुण ३,६९,२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जवळ बाळगला.
ज्यामध्ये १०,००० रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, रेल्वेचे टिकीट व ३,५९,२०० रुपये किंमतीचा ८९८ ग्रॅम वजनाचा आफिम हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता बाळगताना पोलिसांना मिळुन आला. त्याने त्याच्याकडे मिळुन आलेला आफिम हा अंमली पदार्थ त्याच्या गावाकडील ओळखीचा इसम सह आरोपी क्र २ याच्याकडुन आणला असल्याचे त्याने सांगितले आहे.
१) नारायण चेतनराम चौधरी (वय ४१ वर्षे, रा. जालबसर, बिकानेर, राजस्थान), २) सुगनाराम (रा. उदरासर, बिकानेर, राजस्थान – संपुर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी आरोपींची नावे आहेत. पैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्यात ८६९/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७(ख) व २९ नुसार गुन्हा दाखल आजे. सपोनि पाटील पुढील तपास करीत आहेत.











![[वाकड] :- 'आफिम' अंमली पदार्थ विकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांकडून जेरबंद...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-3-1-90x60.jpeg)
![[वाकड] :- 'आफिम' अंमली पदार्थ विकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांकडून जेरबंद...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-5-1-90x60.jpeg)





