न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- अनोळखी इसमांनी ऑनलाईन मिक्स ड्रायफ्रुटसची ऑर्डर खरेदी करण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला फेक लिंक पाठवण्याचा बहाना केला. फसवणुकीच्या इरादयाने पैसे देण्यास भाग पाडुन व विश्वास संपादन केला.
डिमार्ट रेडी या ऑनलाईन अॅप कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून फेक लिंकद्वारे फिर्यादी यांची एकुण ५०,००० रूपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २५/०८/२०२३) रोजी बिजलीनगर, रेलविहार जवळ, चिंचवड येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी १) मोनं ७७२२८२१३२३ २) मो.नं ४४६११०७२०१ या मोबाईल नंबरधारकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात ४३४/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोनि (गुन्हे) जाधव पुढील तपास करीत आहेत.











![[बिजलीनगर] :- डिमार्टचे प्रतिनिधी असल्याचे भासवत महिलेची आर्थिक फसवणूक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-4-1-90x60.jpeg)





