- पतीचा इगो दुखावला; बायकोला संपविण्यासाठी चाकूने वार केला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- देहूरोड येथील सीओडी डेपोकडून भविष्यात मिळणा-या पेन्शनला पत्नी म्हणुन फिर्यादी यांचे नाव लावावे, यासाठी फिर्यादी यांनी सीओडी डेपो, देहुरोड येथे विनंती अर्ज केला होता. या तसेच चारीत्र्यावर संशय घेत फिर्यादीला त्यांच्या आरोपी पतीने वेळोवेळी हाताने मारहाण, शिवीगाळी, दमदाटी करुन फिर्यादी महिलेचा शारीरीक व मानसिक छळ केला.
घरातील चाकुने फिर्यादी महिलेच्या गळ्यावर आरोपीने चाकुने वार केला आहे. त्यामध्ये त्यांचा गळा व डाव्या हाताच्या तीन बोटाच्या नसा कापल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना सन २०१० पासुन ते दि. ०९/०८/२०२३) रोजी रात्री १२.०० च्या दरम्यान वेळावेळी फिर्यादीच्या राहत्या घरी कोटेश्वरवाडी येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी पती दिलीप हरीभाउ दाभाडे (वय ५१ वर्षे, रा. कोटेश्वरवाडी, ता मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी २२८/२०२३ भादवि कलम ३०७, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोउपनि चव्हाण पुढील तपास करित आहेत.











![[तळेगाव]:- देहूरोडच्या सीओडी डेपोकडे पेन्शनसाठी पत्नीने अर्ज केला..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-5-1-90x60.jpeg)
![[तळेगाव]:- देहूरोडच्या सीओडी डेपोकडे पेन्शनसाठी पत्नीने अर्ज केला..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-10-90x60.jpeg)





