- तरुणासह आईला दगडाने मारहाण; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- गाडीने घरी जात असताना फिर्यादी हे गल्लीमध्ये वळत होते. तेथे एक चारचाकी मारुती व्हॅन रस्त्याच्या मध्ये थांबलेली असल्याने फिर्यादीला जाता येत नव्हते. म्हणुन फिर्यादी यांनी गाडीचा हॉर्न वाजविला. त्यावेळी तिथे असणारे आरोपी क्र. १ व २ यांनी फिर्यादीला वाईट वाईट शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यांच्या गाडीचेही नुकसान केले. दोन अनोळखी महीलांनीही शिवीगाळी करुन फिर्यादी व त्यांच्या आई वडीलांना हाताने मारहाण केली. आरोपी क्र. १ याने रस्त्यात पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या आईच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. फिर्यादीला ‘माझ्या नादी लागायचे नाही; नाहीतर सर्वांना मारुन टाकील’ अशी धमकी देत आरोपी तिथून निघुन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ३१/०८/२०२३) रोजी संध्याकाळी ७.३० वाजता अन्नपुर्णा पिठाची गिरणीसमोर, गल्ली क्रमांक १, धर्मराजनगर, पाटीलनगर, चिखली येथे व फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर घडली.
फिर्यादी केतन कृष्ण वाघमोडे यांनी आरोपी १) अविनाश गायकवाड (वय वय अंदाजे २४ वर्ष रा. कॉलनी नंबर ३ धर्मराज नगर पाटीलनगर चिखली), २) अविनाश गायकवाडचा मित्र (नांव पत्ता माहीती नाही), ३) दोन अनोळखी महीला (नांव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलीस ठाण्यात ५८८/२०२३ भा.दं.वि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७,३४ प्रमाणे आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोहवा चोरगे पुढील तपास करीत आहेत.










![[चिखली]:- 'माझ्या नादी लागायचे नाही; नाहीतर सर्वांना मारुन टाकील'..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-2-2-90x60.jpeg)
![[चिखली]:- 'माझ्या नादी लागायचे नाही; नाहीतर सर्वांना मारुन टाकील'..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-5-90x60.jpeg)



