न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- अज्ञात वाहनावरील अज्ञात वाहन चालकाने हयगयीने, भरगाव वेगात, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन होंडा अॅक्टीव्हाला जोरात धडक दिली. गाडीवरून खाली पडल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे त्यांचा अपघातात मृत्यू झाला.
सागर सुनिल गुंड असे फिर्यादीच्या मयत भावाचे नाव आहे. आरोपी वाहनचालक कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २) रोजी सायं. ६.३० च्या सुमारास, देहुरोड ते निगडी, जुना पुणे मुंबई हायवेवर, केद्रीय विद्यालयासमोर समोर घडली. फिर्यादी अक्षय सुनिल गुंड यांनी आरोपी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलीसांनी ४९२/२०२३ भा.द.वि.क.३०४ (अ) २७९ ३३७, ३३८ मो.वा.का. कलम १८४,१३४/१७७ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि थिटे पुढील तपास करीत आहेत.











![[देहुरोड]:- अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई-पुणे महामार्गावर दुचाकीस्वार ठार...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-1-2-90x60.jpeg)
![[देहुरोड]:- अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई-पुणे महामार्गावर दुचाकीस्वार ठार...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-3-2-90x60.jpeg)





