न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- संगणमत करून फिर्यादी यांना हिंजवडी येथील तमन्ना हॉटेल, हयात हॉटेल येथे बोलावुन घेतले. मार्केट नेटवर्किंगमध्ये जॉब आहे, असे सांगुन खोटे सांगुन जॉबसाठी दिड लाख रुपये भरावे लागतील, अशी फिर्यादीकडे आरोपींनी पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यांना माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगीतल्यानंतर आरोपी यांनी फिर्यादीला ‘तु आम्हांस फक्त तुझे आधारकार्ड दे आणी तुला प्रत्येक आठवडयाला खात्यावर पैसे येतील’ असे सांगितले. फिर्यादीने त्यांना आधारकार्ड दिले. आरोपी यांनी फिर्यादीच्या नावे विफीन फाईनान्स मध्ये १,३७,०२९ रुपयांचे फिर्यादीच्या माहितीशिवाय लोन केले.
फिर्यादीच्या खात्यावर पैसे आले. आरोपी क्रं १ हीने फिर्यादी यांना हिंजवडी येथील हयात हॉटेल येथे बोलावुन घेत फिर्यादीकडुन त्यांचा फोन घेतला. फिर्यादीच्या खात्यावरुन तिच्या खात्यावर १५,००० रुपये व ८०,००० रुपये तिच्या नावावर ऑनलाईन घेतले. तसेच ५०,००० रुपये हे तिच्याच ओळखीच्या कोणाच्यातरी नावावर पाठवले, असे एकुण १,४५,००० रुपयांची सर्वांनी मिळुन फिर्यादीची फसवणुक करुन पैशांचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २८/०६/२०२३ ते दि.०३ जुलै २०२३) दरम्यान हयात हॉटेल व तमन्ना हॉटेल, हिंजवडी येथे घडली. फिर्यादी युवराज कांबळे यांनी १) महिला आरोपी, २) मोहीत गोयल, ३) आकाश शिगळे, ४) गोविंद पाटील यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. हिंजवडी पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात १०४४/२०२३ भा.द.वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.










![[हिंजवडी]:- नोकरीसाठी तरुणाकडे पैशांची मागणी; पैसे न दिल्याने केले असे काही...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-3-2-90x60.jpeg)
![[हिंजवडी]:- नोकरीसाठी तरुणाकडे पैशांची मागणी; पैसे न दिल्याने केले असे काही...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/SAVE_20230903_123158-90x60.jpg)



