न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र किल्लेदार यांच्याद्वारे संपादित “मराठी कविताएं हिन्दी में” या मराठी कवितांच्या हिंदी अनुवादित प्रातिनिधिक संग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
अध्यक्षस्थानी संपादक डॉ. उमा कंपूवाले होत्या. मुख्य पाहुणे म्हणून हिंदी साहित्यकार माता प्रसाद शुक्ल, गजलकार राम अवध विश्वकर्मा, ज्येष्ठ कविवर्य शिवाजी सांगळे हे उपस्थित होते. त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
पुणे, पिंपरी चिंचवडच्या संध्या केळकर, यशवंत देव, तुकाराम पाटील, मकरंद घाणेकर, विश्वनाथ शिरढोणकर, जागृति निखारे या काव्यानंद प्रतिष्ठानच्या सभासदांच्या कविता यात अंतर्भूत आहेत. पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक वि. ग.सातपुते यांची प्रस्तावना लाभली आहे तर मुख्यपृष्ठ शिवाजी सांगळे यांनी केले आहे.















