न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- रुपीनगर शाखेच्या वतीने संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन ३ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये ४०७ श्रद्धाळूंनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. वाय.सी.एम.रक्तपेढी आणि संत निरंकारी रक्तपेढीच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ४०७ युनिट रक्त संकलन करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रमुख) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला आ. बनसोडे यांनी भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले.
गेल्या १५ दिवसांपासून मिशनच्या स्वयंसेवकांनी रूपीनगर परिसरामध्ये रक्तदानाची जनजागृती केली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक भास्कर म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्याचे, मान्यवरांचे आभार रुपीनगर शाखा प्रमुख प्रल्हाद गोगरकर यांनी केले.















