- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीकडून सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- पिपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयात निगडी वाहतूक विभागात कार्यरत असणाऱ्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या.
१० वर्षापेक्षा जास्त पिंपरी चिंचवड वाहतूक विभागात नागरी सुरक्षेकरिता त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असल्याने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम निगडी पोलीस मुख्यालयात संपन्न झाला.
या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे (वाहतूक), निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, वरि.पोलीस निरीक्षक राम राजमाने, सुनिल पिंजण, शैलेश गायकवाड, प्रसाद गोकुळे, विलास सोंडे, दिपक लगड त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे, शंकर डामसे, वर्षाराणी पाटील, दिपक साळुंके, सहायक पोलिस निरीक्षक आरदवाड,गजरमल, पोलीस उप निरीक्षक ऑगस्टीन डिमेलो, प्राधिकरण नागरी कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, संपर्क प्रमुख विजय मुनोत,विभाग प्रमुख विशाल शेवाळे,सतीश देशमुख, शशिकांत इंगळे, संजय शिरसाठ, बाबासाहेब घाळी, तेजस सापरिया, जयेंद्र मकवाना कै. तुकाराम तनपुरे फौंडेशन चे अध्यक्ष अशोक तनपुरे, संतोष चव्हाण उपस्थित होते.
या प्रसंगी सहाय्यक आयुक्त कुबडे म्हणाले,” प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस खात्यात असा निरोप समारंभ,सन्मान फार कमी अधिकाऱ्यांना प्राप्त होतो. खात्यात सर्व्हिस करत असताना अनेक अडचणींना पोलिसांना समोरे जावे लागत असते. त्यामुळे निवृत्ती विनाअडथळा मिळणे चांगल्या कामाची पावती पोलीस खात्यात समजली जाते, निगडी वाहतूक विभागात शिस्तबद्ध व प्रामाणिक पणे आपली नागरी सेवेची जबाबदारी कारंडे यांनी व्यवस्थित सांभाळल्याचे दिसून आले आहे.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” १९९५ साली मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेल्या विजया कारंडे यांनी २००८ साली निगडी वाहतूक विभागात सहायक पोलीस निरीक्षक हा पदभार सांभाळला.पुन्हा बदली होऊन चिंचवड वाहतूक विभागात काम केले आणि शेवटी निगडी वाहतूक विभागात त्यांनी सेवानिवृत्त होईपर्यत काम केले. अश्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक नियोजनात व रस्ता विकास कामांत त्यांचे योगदान लक्षवेधी होते.पालिका अधिकारी, नागरिक व प्रशासनात योग्य समन्वय आमलात आणून त्यांनी वाहतूक समस्यांचे निराकरण केले.त्यामुळे त्यांच्या नागरी सेवा योगदानाबद्दल संस्थेतर्फे त्यांचा आज सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.”
कार्यक्रमाचे संयोजन निगडी वाहतूक पोलीस कर्मचारी पी.एम कोल्हे,डुबे,उभे,ढोले,तांदळे,जाधव,आहेरराव,पारधी, कोळी, आहेर,सांगळे,सुरवसे,पाटील,सरिता पवार,प्रिया पवार,रुपाली सोनवणे,राणी सिंग, मनीषा कांबळे,सुवर्णा लंडकत,लक्ष्मी मंजुळकर,मांडवकर यांनी केले.सूत्रसंचालन मिरची फेम आर जे अक्षय यांनी केले.















