न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारु तयार करुन विकणाऱ्या कुप्रसिध्द गुन्हेगाराविरुद्ध पोलीस आयुक्तांनी “एमपीडीए” कायदयान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
किरण रमजान माचरे (वय ४२ वर्षे, रा. भाटनगर, पिंपरी) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, विक्री करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगाराचा अभिलेख तपासून त्याच्यावर परीणामकारक व कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या गुन्हेगारावर एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आरोपीविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा येथे (दि. ०५) रोजीपासून स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त परि ०१ विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे- १) बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त (पिंपरी विभाग ) सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राम राजमाने (पिंपरी पो.स्टे.), वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पी.सी.बी. गुन्हे शाखा), पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.ना. कारभारी (पी.सी. बी. गुन्हे शाखा), स.पो.फौ. अनिल गायकवाड, पो.ना. ओंकार बंड (पिंपरी पो.स्टे.) यांनी केली आहे.
एम. पी. डी. ए. कायदयान्वये स्थानबद्धतेच्या एकूण ५ कारवाई करण्यात आलेल्या असून यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.










![[पिंपरी]:- भाटनगरचा कुप्रसिध्द गुन्हेगार किरण माचरेवर](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-4-3-90x60.jpeg)
![[पिंपरी]:- भाटनगरचा कुप्रसिध्द गुन्हेगार किरण माचरेवर](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/3278a1fe-79fb-44eb-a95e-796d8c68e625-90x60.jpeg)



