न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- घराला कडी लावुन शेजारी असलेल्या सासुच्या घरी महिला फिर्यादी या गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांच्या परिसरात राहणारा इसम आरोपी हा फिर्यादीच्या घराची कडी उघडुन फिर्यादीच्या घरात घुसला. माळ्यावरती लपुन बसला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती घरात झोपले असताना आरोपी हा माळ्यावरुन खाली आला. त्याने हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवुन फिर्यादीसह पतीला जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादी यांच्या पतीच्या पाकिटातील २,३०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ७) रोजी रात्री २.१० वाजेच्या सुमारास भाजी मंडईजवळ, पिंपरी येथे घडला. महिला फिर्यादीने हर्ष उर्फे लड्या अमर बहोत याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पिंपरी पोलिसांनी ९१९/२०२३ भा. द. वि. कलम ३९२, ४५२, ४५७,५०६ (२) आर्म अॅक्ट कलम ४ ( २५) (२७) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. म पो उपनिरी कादबाने पुढील तपास करीत आहेत.










![[पिंपरी]:- नवरा-बायको घरात झोपले असताना माळ्यावरून अचानक प्रकट झाला, अनं...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-9-90x60.jpeg)
![[पिंपरी]:- नवरा-बायको घरात झोपले असताना माळ्यावरून अचानक प्रकट झाला, अनं...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-14-90x60.jpeg)



