न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- टेलिग्राम युजर आयडीच्या वापरकर्त्या इसमांनी संगनमताने फसव्या वेब पेजच्या माध्यमातून फिर्यादीला टास्क कंम्प्लीट केल्यानंतर तात्काळ आकर्षक पैसे कमविण्याचे आमिष दाखविले.
फिर्यादीकडून एकूण ८,९६,००० रुपये रक्कम फसवणूकीने प्राप्त करुन घेतली. कोणताही परतावा न देता मूळ गुंतविलेली रक्कम स्वत:च्या फायदयाकरीता वापरुन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. ०४/०३/२०२३ पासून ते २१/०३/२०२३ रोजी पर्यंत) संगणकिय साधनाद्वारे, टेलिग्राम या सोशल मिडीयावर फिर्यादी घरी असताना घडला.
फिर्यादी सूरज बाबासाहेब माने यांनी टेलिग्राम युजर आयडी @Adiyabhavana, @shsh164 @kscircus चा वापरकर्ता इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ७३१/२०२३, भादवि कलम ४१९, ४२० सह कलम ६६ ( क ), ६६ (डी), माहिती तंत्रज्ञान अधिनीयम प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वपोनि जाधव हे पुढील तपास करीत आहेत.










![[भोसरी]:- टास्क कंम्प्लीट केल्यानंतर तात्काळ आकर्षक पैसे कमविण्याचे आमिष पडले भारी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-1-5-90x60.jpeg)
![[भोसरी]:- टास्क कंम्प्लीट केल्यानंतर तात्काळ आकर्षक पैसे कमविण्याचे आमिष पडले भारी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/62a88f9293fb8-90x60.jpg)



