न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- आळंदी मधील कोयता गँगच्या दोन आरोपींना दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली असून आरोपींवर मोका (“MCOCA”) कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पाहिजे आरोपी १) शाम रवि विटकर (वय २२ वर्षे), २) अजय किसन देवरस (वय २३ वर्षे), ३) ज्ञानेश्वर सिध्दार्थ बडगे (वय ३० वर्षे) व ४) राकेश सुरेश काळे (वय २३ वर्षे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीतील योगीराज चौक येथे (दि. १९/०६/२०२३) रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास फिर्यादी दुकानावर हे फळविक्री करत होते. त्यावेळी आरोपी शाम विटकर, ज्ञानेश्वर बडगे, राकेश काळे, अजय देवरस हे दुचाकीवरून आले. त्यापैकी दुकानावर फिर्यादीला आरोपी अजय देवरस याने कोयता दाखवून ”आम्ही कोयता गॅगची माणसे आहोत, आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे’. शाम विटकर याने, ‘तुला येथे धंदा करावयाचा असेल तर आम्हाला रोजचे २०० रुपये हप्ता दे, नाहीतर तुझे दुकान तोडून टाकील’, अशी धमकी दिली होती. आरोपींनी फिर्यादीसह आजुबाजच्या दोन फळ विक्रेत्याकडुन कोयत्याचा धाक दाखवुन खंडणी घेतली. परीसरात दहशत माजवुन नागरीकांना त्रास दिला. याप्रकरणी दिघी पोलीसांनी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार दिघी पोलीस ठाण्यात गु. रजि नं. २७८/२०२३ भा. द. वि. कलम ३८४, ३८५, ५०६, ३४ भारतीय हत्यार अधिनियम कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच कोयता गँग आळंदी तसेच दिघी पोलीस ठाणे हद्दीत हातात कोयता घेवुन नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करत असल्याने सदर गुन्हयांचा सखोल तपास करण्याचे पोलीस आयुक्तांनी पोलिसांना आदेश दिले होते.
सदरचा तपास चालू असताना पाहिजे आरोपी १) शाम रवि विटकर (वय २२ वर्षे), २) अजय किसन देवरस (वय २३ वर्षे), ३) ज्ञानेश्वर सिध्दार्थ बडगे (वय ३० वर्षे) व ४) राकेश सुरेश काळे (वय २३ वर्षे) यांनी खुनाचा प्रयत्न करणे, जबरी दुखापत करणे, दरोडा टाकणे, विनयभंग करणे, मारामारी करणे, जबरी दुखापत करणे, खंडणी मागणे यांच्यावर यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी प्रत्येक वेळेस वेगवेगळया गुन्ह्यामध्ये वेगवेगळे साथीदार वापरून गुन्हे केले असुन आरोपी विरोधात पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे शहर आयुक्तालयात हद्दीमध्ये एकुण ०८ गुन्हे दाखल आहेत. आरोपी वारंवार वेगवेगळे साथिदार वापरुन संघटीतपणे टोळीने गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदरच्या कारवाईत ज्ञानेश्वर आणि राकेश या दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मअप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परीमंडळ ०३ संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिंह गौर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिघी पोलीस ठाणे मच्छिंद्र पंडीत, दशरथ वाघमोडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सुनिल भदाणे, पोलीस उप निरीक्षक, दत्ताञय ननावरे पोलीस उप निरीक्षक, पोहा ७१३ चिंतामण फलके, पोहा ८०१ प्रदीप पोटे, पोहा ९५३ शरद विंचु पोहा १०२० किशोर कांबळे, पोहा ११६८ सतीष जाधव, पोहा १४०६ शशिकांत पवार, पोना १५७२ किरण जाधव, पोशि २०९४ बाबाजी जाधव, पोशि २८२८ वैभव काकडे, पोशि ३५५३ कसबे व पोशि ३३९१ भोसले यांनी केली.