न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- मोबाईलच्या गुगल ड्रायीवमध्ये मेमरी फुल झाल्यामुळे फिर्यादी ती एक्सट्रा मेमरी गुगलवरुन विकत घेत होते. त्यावेळी फिर्यादीला Ishankaushal@[email protected] वर फिर्यादीच्या मोबाईलचा सर्व डाटाचा बॅकअप इमेल आयडीवर जात असल्याचा त्यांना दिसला.
तो ईमेल आयडी हा फिर्यादीच्या आरोपी मित्राने फिर्यादीच्या मोबाईलमधुन फिर्यादीचा सर्व डाटा त्याच्या मोबाईलमध्ये चोरुन घेवुन फिर्यादीचा मोबाईल हॅक केला आहे. तसेच फिर्यादीच्या क्रेडीट कार्ड वरुन ८२,२१३ रुपये भरुन घेतलेला मोबाईल घेतला व त्याची पावतीहि त्याच्या नावावर करुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीचा मोबाईल घेवुन जावुन फिर्यादीचा विश्वासघात केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.३१/०७/२०२३ रोजी ते दि.१०/०९/२०२३ रोजी पर्यंत) ग्रँड हायस्ट्रीट मॉल येथे आतमध्ये युनिकॉर्न शोरुम, हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी इशान विनायक कौशल (वय ३१ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपीवर १०६२/२०२३ भा.द.वि. कलम ४०६, माहीती तंत्रज्ञात कायदा कलम ४३ (अ), ६६ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मपोउपनि बोरकर पुढील तपास करीत आहेत.