न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- लिंक पाठवून टेलीग्रामच्या VIP TASK 4362 या ग्रुपला फिर्यादीला जॉईंट होण्यास सांगितले. त्या ग्रुपच्या माध्यमातून फिर्यादीला टास्क पाठवून ते पुर्ण करण्यासाठी ३,५,७०० रुपये भरण्यास सांगून फिर्यादीची आरोपींनी ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०५/०९/२०२३ रोजी रात्री १२. ४६ वा. ते दि ०९/०९/२०२३ रोजी पर्यंत) मोरवाडी, पिंपरी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी १) अज्ञात महिला, २) अज्ञात इसम कुश, ३) अज्ञात इसम येरीअल, ४) अज्ञात ९६१०४६९१६१ धारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ९२२/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ३४, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोनि नाईकवाडे पुढील तपास करीत आहेत.