न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- मेडीकलमधुन गोळ्या औषधे व इतर वस्तुंची खरेदी केली. वस्तुंचे झालेले बील ३,६५० रुपये ट्रान्सफर केल्याचे खोटे ट्रान्सफर मोबाईलमध्ये दाखवले. खोटे नाव सांगुन सदर रकमेची व फिर्यादीची फसवणुक केली. तसेच आणखी एकाची देखील ४,४०० रुपये रकमेची फसवणुक केली. आरोपी महिला व पुरुष हे वारंवार लोकांची फसवणुक करत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १९/०४/२०२३) रोजी ७.०० वा. च्या सुमारास संगम मेडिको, रोहित मंगल केंद्राजवळ, ताथवडे चौक, ताथवडे येथे आणि दि. २७/०८/२०२३ रोजी ३.३० वा. श्रीविनायक स्टेशनरी, श्रीराम वडापाव शेजारी, दत्तमंदिर रोड, वाकड येथे घडला.
फिर्यादी नरेश शेषाराम चौधरी (मेडिकल व्यवसायिक) यांनी आरोपी शिवराज भोसले मो.नं. ९३०७००१६४५ व एक अनोळखी महिला या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्यात ८९९/२०२३ भा.दं.वि. कलम भा. दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.