- पालिका अधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- पिंपळे सौदागर प्रभागातील झिंजुर्डे मळा परिसरात अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नसल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मा. नगरसेवक शत्रुघ्न यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. स्थानिक रहिवाशांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
परिसरातील बैठी घरं आणि सोसायटीतील नळ जोडण्या या जुन्या लाईनवरून नविन पाणीपुरवठा लाईनवर स्थलांतरित करण्याबाबत अधिकाऱ्यांना काटे यांनी सूचना केल्या आहेत. लवकरच पाणीप्रश्न सोडवू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले, अशी माहिती शत्रुघ्न काटे यांनी दिली.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता जय कानडे, बाळासाहेब काटे, पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.